महाराष्ट्र साहित्य परिषदेची अमळनेर शाखा कार्यकारणी जाहीरअध्यक्षपदी संदीप घोरपडे – कार्याध्यक्षपदी रमेश पवार..

0
New-Doc-07-24-2025-22.05.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अमळनेर शाखेची नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी संदीप बाबुराव घोरपडे, कार्याध्यक्षपदी रमेश यशवंत पवार, प्रमुख कार्यवाह पदी दिनेश वसंतराव नाईक तर कोषाध्यक्षपदी उमेश प्रतापराव काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवृत्त उपप्राचार्य प्रा. श्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मल्हारराव देशमुख, कार्यवाहपदी विजया राजेंद्र गायकवाड, तर सदस्यपदी नरेंद्र दिनकरराव निकुंभ, डॉ. रमेश नामदेव माने, दिलीप राजाराम सोनवणे, निरंजन रमेश पेंढारे, गोकुळ गोविंदा बागुल, शरद भिका पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मोहन मराठे, भारती संजय सोनवणे व सुनीता रत्नाकर पाटील यांची निवड झाली.

मराठी वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, प्रा. श्याम पवार व मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांच्या समितीने या कार्यकारणीची निवड केली. सभेत नवीन कार्यकारिणीचे स्वागत सत्कार करण्यात आला. मार्च २०२५ ते जून २०२५ या कालावधीत झालेल्या जमा-खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच दोन स्थानिक लेखकांच्या पुस्तकांच्या वाचन व चर्चासत्राचे आयोजन, आगामी कार्यक्रमांची आखणी व राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक निवडीबाबत चर्चा झाली प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed