अरुण इच्छाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्षपदी नियुक्ती.

0
New-Doc-07-24-2025-07.12-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी अरुण इच्छाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केली असून, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिनेश शेलकर उपस्थित होते.

अरुण पाटील हे आमदार अनिल पाटील यांचे कट्टर समर्थक असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल छत्रपती शिवाजी महाराज गार्डन गृप, राजे शिवाजी मित्र मंडळ, जी.एस. गृप, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, संजय चौधरी, चेतन राजपूत, जीवन पवार, शरद पाटील, प्रमोद वाघ, विनोद कदम, भटू पाटील, अलिम मुजावर, ईम्रान खाटीक व विक्रांत पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed