श्री अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा.                                                  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी..

0
New-Doc-07-22-2025-22.40.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीवर मंगळवार, दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता भव्य वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार, सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, हीच जबाबदारी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी यावेळी केले.

या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच महिलामंडळ मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या या उपक्रमामुळे परिसरात हिरवाई वाढविण्यास हातभार लागणार आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed