बालिका स्नेही पंचायततर्फे स्वच्छ भारत मिशन निबंध स्पर्धेचे आयोजन..

0
New-Doc-07-16-2025-23.06.jpg

आबिद शेख/अमळनेर

पिंपळे खु, ता. अमळनेर : पिंपळे खु येथील बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या वेळी बालिका स्नेही पंचायतच्या सरपंच सौ. गायत्री विनोद पाटील, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच अनमोल सहकारी ओम साई क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर पाटील सर उपस्थित होते.

पावसाळ्याच्या दिवसात डेंगू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सुंदर लेखन सादर केले.

गावातील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. बालिका स्नेही पंचायतच्या सरपंच सौ. गायत्री विनोद पाटील यांनी पुढील काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed