खा. स्मिताताई उदयराव वाघ यांचा संसद भारती पुरस्काराने गौरव..
आबिद शेख/अमळनेर

“सी एस आर टाईम्स” या संस्थेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित “संसद भारती पुरस्कार 2025” खासदार स्मिताताई उदयराव वाघ यांना प्रदान करण्यात आला आहे. लोकसभेतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची तसेच मतदारसंघातील सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.

हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते 15 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या १२व्या राष्ट्रीय सी.एस.आर. संमेलनात प्रदान करण्यात आला. यावर्षीचे संमेलन “विकसित भारत मिशन 2047 मध्ये सीएसआरची भूमिका” या विषयावर आयोजित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, सी एस आर टाईम्स संस्थेने “संसद भारती पुरस्कार” प्रथमच एका राजकीय व्यक्तीला व विशेषतः संसदेत थेट निवडून आलेल्या एका महिला खासदारास प्रदान केला आहे. संसदेमधील सक्रिय सहभाग, लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेली भूमिका आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सखोल अभ्यास करून हा सन्मान खासदार वाघ यांना देण्यात आला.
पुरस्कार स्विकारल्यानंतर खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की,
“हा सन्मान माझ्या मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे, सहकाऱ्यांच्या अखंड सहकार्यामुळे आणि नेत्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि जलसंपदा मंत्री संकटमोचक गिरीजीभाऊ महाजन यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.”
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
