जयंत पाटील यांचा खुलासा : “राजीनामा दिलेला नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चा निराधार”

0
New-Doc-07-15-2025-07.01.jpg

24 प्राईम न्यूज 15 जुलै 2025


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “आजही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. मी राजीनामा दिलेला नाही. तसेच भाजप प्रवेशासाठी मी कोणतीही विनंती केलेली नाही. त्यामुळे याबाबत वावड्या उठवू नका,” असे पाटील यांनी सोमवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसांपासून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अखेर त्यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक आज, मंगळवारी, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. “प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून निर्णय झालेला नाही. अन्य काही लोकांप्रमाणे माझेही नाव चर्चेत आहे, मात्र अंतिम निर्णय मंगळवारीच्या बैठकीत होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed