लोकवर्गणी रद्द करा, शिक्षणकर कमी करा – अमळनेरकर पुन्हा आक्रमकमुख्याधिकारी तुषार नेरकर यांची ग्वाही : “कायदेशीर बाबी तपासून जनहिताचा निर्णय घेऊ”


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : गेल्या १३ वर्षांपासून सक्तीने वसूल होणारी लोकवर्गणी रद्द करा व जळगाव महापालिकेच्या तुलनेत १४ टक्के जादा असलेला न.पा. शिक्षणकर कमी करा, या मागण्यांसाठी अमळनेरकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत आयोजित बैठकीत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी, “हे सर्व कर जुन्या ठरावांनुसार लावले गेले आहेत. मात्र, कायदेशीर बाबी तपासून जनहिताचे व न्याय्य निर्णय घेऊ,” अशी ग्वाही दिली.
पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली निवेदन
रविवारी झालेल्या सहविचार सभेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व मालमत्ता धारकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. तत्पूर्वी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी पालिका सभागृहात सर्वांचे म्हणणे ऐकण्यासाठी बैठक घेतली. या वेळी उपमुख्याधिकारी श्री. चव्हाण व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रमुख मागण्या व मुद्दे
संजय पाटील : जळगाव व अमळनेर करातील मोठी तफावत दाखवून, अमरावती येथील संस्थेस दिलेला सर्वेक्षण ठेका रद्द करण्याची व करवाढ मागे घेण्याची मागणी.
प्रशांत निकम : मालमत्ता हस्तांतरण शुल्क २% वरून कमी करण्याची, लोकवर्गणी रद्द करण्याची सूचना. अन्यथा जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा.
अनंत निकम : खाजगी संस्थेचा ठेका डीनाईड करून शिक्षणकर कमी करण्याची मागणी.
अनिल कासार : हायकोर्टाच्या निकालानुसार सर्वांची लोकवर्गणी माफ करण्याची मागणी.
चेतन राजपूत : नवीन मालमत्ता धारकांना नोटीस असताना जुन्या मालमत्तांची मोजणी का केली, असा प्रश्न.
पाणीपट्टीवरील २% शास्ती, वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा. मुख्याधिकाऱ्यांची स्पष्टीकरणे व आश्वासन
मुख्याधिकारी तुषार नेरकर म्हणाले –
शहरात २३ हजार मालमत्ता धारकांपैकी ४१८७ जणांनाच नोटीस देण्यात आली आहे.
कोणतेही दुकानभाडे वाढ अथवा नवीन करवाढ नाही, तर जुन्या ठरावांनुसारच कर लावला गेला आहे मालमत्ता हस्तांतरण २% कर, न.पा. शिक्षणकर, लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील शास्ती यासंबंधी कायदेशीर बाबी तपासून कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन कौन्सिलच्या पहिल्याच सभेत अन्यायकारक ठराव रद्द करण्याचा प्रयत्न राहील.
आठ दिवसात निर्णय सहविचार सभेच्या मागणीवर आठ दिवसांत उचित निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन पत्रकार संघास देण्यात आले.
या बैठकीत पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, सचिव जितेंद्र ठाकूर, संदीप पाटील, मुन्ना शेख, आबिद शेख,यांच्यासह रणजीत शिंदे, पंकज चौधरी, भूषण भदाणे, बाळासाहेब संदानशिव, गोपी कासार, राजू पाटील, महेश कोठावदे, प्रशांत निकम, अनंत निकम, सुभाष चौधरी, मनोज पाटील, सूनिल शिंपी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
