हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या संचालक मंडळाचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..

0
New-Doc-07-15-2025-06.08.jpg

आबिद शेख/अमळनेर
स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर अ‍ॅण्ड पब्लिक लायब्ररी तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने मुस्लिम समाजात पहिली सामुहिक विवाह परंपरा सुरू करणाऱ्या हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हाजी शब्बीर अली सैय्यद यांनी भूषविले. प्रारंभी प्रस्ताविक करताना सुन्नी दारूल कजा व स्टडी सेंटरचे अध्यक्ष मौलाना रियाज शेख म्हणाले की, “हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था ही अमळनेर येथील मुस्लिम समाजात सामुहिक विवाह पार पाडणारी पहिली संस्था असून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण आहे.”

५० जोडप्यांचे लग्न, संसारोपयोगी भेटवस्तूंचे वाटप सन 2017 पासून 2024 पर्यंत संस्थेने गरीब, गरजू मुस्लिम समाजातील ५० जोडप्यांचे कोणतेही शुल्क न घेता विवाह लावून दिले असून, त्यांना संसारोपयोगी भांडी, पलंग, पिडी, कपडे, गॅस, कपाट इत्यादी साहित्य भेट देऊन त्यांचा संसार उभा करण्यास मदत केली आहे. येत्या ऑक्टोबर 2025 मध्ये 11 सामुहिक विवाहांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव अजहर अली सैय्यद यांनी संस्थेची कार्यावली सविस्तर सांगितली. नव्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर अ‍ॅण्ड पब्लिक लायब्ररीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकारी:
अध्यक्ष: मोना शेख
उपाध्यक्ष: सैय्यद नबी, जुबेर पठाण
सचिव: अजहर अली
सहसचिव: अशफाक शेख
खजिनदार: आरिफ मेमन

सदस्य: शब्बीर पहलवान, जाकिर शेख पहलवान, जाकिर शेख
या प्रसंगी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल लतीफ शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हाजी ताहेर शेख, कमरोदीन शेख, युसुफ पेंटर, अमजद अली शाह, जाविद पेंटर, जमालुद्दीन शेख, सैय्यद अहमद अली, शकील शेख, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे, मुश्ताक बागवान, फारुक खाटीक, सिकंदर पेंटर, मुन्ना बेलदार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसुद पठान कुरेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हाजी ताहेर शेख यांनी मानले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed