अमळगाव-जळोद रस्त्यावर भीषण अपघात: २ गंभीर, २० शेतमजूर जखमी..
आबिद शेख/अमळनेर

चोपडा तालुका | १२ जुलै – शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन गंभीर जखमींसह एकूण २० जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अमळगाव-जळोद रस्त्यावर घडली.

बुधगाव येथून एमएच १९ बीजे ४३६५ क्रमांकाच्या रिक्षामध्ये सुमारे १६ शेतमजूर अमळगावकडे जात होते. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या चारचाकी (एमएच १९ सीझेड २५२२) वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. चालक पवन तुकाराम बाविस्कर याच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या धडकेत काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले, तर काहीजण रिक्षात अडकले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, राहुल पाटील आणि योगेश बागुल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि जखमींना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रवाना केले.
जखमींपैकी काहींची नावे पुढीलप्रमाणे:
श्री अॅक्सिडेंट हॉस्पिटल, अमळनेर: विकास कोळी (३५), सचिन शिरसाठ (२२), उमेश शिरसाठ (१९), रघुनाथ शिरसाठ (५५), वैशाली कोळी (२७), नंदा कोळी (२८), मुक्ताई भोई (१७), संगीता कोळी (३५), कल्पना कोळी (४७), रिक्षाचालक योगेश कोळी (३१)
धुळे, देवरे हॉस्पिटल: प्रतिभा कोळी, कैलास कोळी, पवन बाविस्कर (चारचाकी चालक), शीतल बाविस्कर, मीराबाई बाविस्कर, अशोका (१३ महिने), प्रांतल कोळी (३ वर्षे)
मोरया हॉस्पिटल, अमळनेर: सुवर्णा कोळी (३५), प्रांजल कोळी (१६)
ग्रामीण रुग्णालय, अमळनेर: रेखाबाई शिरसाठ (४५), सुंदबा कोळी (५३), जनाबाई साळुंखे (७५)
या अपघातप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
