“सकाळचा भोंगा बंद करण्याचा विचार करा!” – अनिल पाटील यांचे मुख्यमंत्रीना मिश्कील टोला..
आबिद शेख/अमळनेर

मुंबई राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात एक दिलखुलास आणि मिश्कील क्षण पाहायला मिळाला. मुख्यमंत्री यांच्या कार्यशैलीचं कौतुक करताना आमदार अनिल पाटील यांनी अचानक ‘सकाळच्या १० वाजताच्या भोंग्या’वरून टोला लगावला.

“मुख्यमंत्रीजी, तुमच्याकडून खूप चांगलं काम होतंय. पण त्या सकाळी १० वाजता वाजणाऱ्या भोंग्याची तक्रार आहे, याचाही विचार करा,” असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
मुख्यमंत्री यांनीही या टिप्पणीचा विनोदी शैलीत स्वीकार करत उत्तर दिलं, “अडचण हीच आहे की, ध्वनी प्रदूषणविरोधात कायदा आहे, पण विचारप्रदूषणाविरोधात कायदा व्हायचा आहे. तो झाला की त्यावर नक्की विचार करू.”
या विनोदाने सभागृहात क्षणभर हास्याचे कारंजे उडाले आणि वातावरण हलकं-फुलकं झालं. मात्र, या चर्चेच्या निमित्ताने सकाळच्या वेळेत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
