नवीन मराठी शाळेच्या आषाढी दिंडीने शहरात नांदला भक्तिभाव..
आबिद शेख/ अमळनेर
— आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने लोकमान्य शिक्षण मंडळाच्या नवीन मराठी शाळेच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल-रुख्मिणीच्या भक्तीत रंग भरले.

दिंडीच्या अग्रभागी लेझीम पथक होते, त्यामागे टाळ-चिपळ्यांच्या गजरात बाल वारकरी सहभागी झाले होते. यामध्ये विठ्ठल-रुख्मिणीच्या वेषातील विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. नंतर भगवंतांची सुंदर सजवलेली पालखी भाविकांच्या नजरा खिळवून ठेवत होती. स्पीकरवर सुरु असलेले अभंग आणि भक्तिगीते यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला दिसत होता.

ही दिंडी पवन चौक, गोपाल चौक, सराफ बाजार मार्गे वाडी चौकात पोहोचली. तेथे पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर वाडी संस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. डी. डी. पाटील, चिटणीस मा. श्री. विवेकानंद भांडारकर तसेच अनेक पालक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अतुल भोई व सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1090/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
