भूमिपुत्र आमदार अनिल दादांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम सचिन पाटील यांच्या पुढाकारातून अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
आबिद शेख/अमळनेर

भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोणताही सोहळा, केक वा पुष्पगुच्छ न करता समाजहिताचा आदर्श उपक्रम राबवण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अंतुर्ली रंजाने ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन बाळू पाटील (सचिन दादा) यांनी स्वखर्चातून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका तयार करून तिच्या लोकार्पणाचा मानस व्यक्त केला आहे.

रवि ज्वेलर्स
सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजूरी
50 %
मजुरीत सूट
22 कॅरेट 916 हॉलमार्क दागिने खरेदीवर
हमखास भेटवस्तू …..
७ जुलै रोजी आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस असून, त्यांच्या प्रेरणेतून हा समाजोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे. नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या दादांच्या कार्याची ही सामाजिक सलामी ठरत आहे.
शहर व तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून, रुग्णांना वेळीच वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय रुग्णवाहिकांची अनुपलब्धता आणि १०८ सेवेवरील ताणामुळे अनेक वेळा रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर त्रास सहन करावा लागतो. अलीकडेच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही परिस्थिती लक्षात घेऊन सचिन दादा पाटील यांनी कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेतून ही रुग्णवाहिका तयार केली आहे. या उपक्रमामुळे मतदारसंघातील गरजूंना आवश्यक वेळी उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे.

