बोरी यात्रेत अवकाळी पावसाचा फटका; पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने जारी कराव्यात मार्गदर्शक सूचना..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील बोरी येथील प्रसिद्ध यात्रा सध्या उत्साहात सुरू असताना अवकाळी पावसामुळे यात्रेतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती असते. आनंद घेण्यासाठी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा व लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.

या पार्श्वभूमीवर, जर एखाद्या वेळी बोरी पात्राला अचानक पूर आला,किंवा मोठ मोठ्या झोक्या खालची वाळू सरकली तर मोठा अनर्थ घडू शकतो हवामान खात्याने एक आठवडा पाऊस पडण्याचे संकेत दिले आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रेतील व्यापाऱ्यांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी आवश्यक गाईडलाईन्स जारी कराव्यात.
यात्रा संपल्याची गावात अधिकृतपणे दवंडी देण्यात यावी, जेणेकरून गावकरी व भाविकांना याची स्पष्ट कल्पना राहील. अशा प्रकारे संभाव्य आपत्ती टाळता येईल व यात्रेचा अनुभव सुरक्षित होईल.
