१११ व्या वेळेस रक्तदान करत गणेश शिंगारेंनी उभा केला सामाजिक सेवेचा आदर्श..

0
New-Doc-05-19-2025-06.10.jpg


आबिद शेख/ अमळनेर – अमळनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात फिल्टर इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले गणेश शिंगारे यांनी शुक्रवारी नगरपालिका व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १११ व्या वेळेस रक्तदान केले. त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा आणखी एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. तसेच, गणेश शिंगारे हे सर्पमित्र म्हणूनही ओळखले जातात.

१८ व्या वर्षी सुरुवात, २७ व्या वर्षी १११ वेळा रक्तदान
गणेश शिंगारे यांनी आपल्या अठराव्या वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा रक्तदान केले होते. त्यानंतर त्यांनी नियमितपणे दर तीन महिन्यांनी रक्तदान करत आज २७ व्या वर्षी १११ वेळा रक्तदान केले आहे. ही सातत्यपूर्ण सेवा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

देहदानाचा घेतलेला संकल्प
गणेश शिंगारे व त्यांच्या पत्नी किरण शिंगारे या दोघांनीही मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी घेतलेली ही शपथ समाजप्रबोधनाचा एक भाग असून इतरांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed