कोळसा भरलेली मालगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले, जीवितहानी टळली.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ प्रताप कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या भागात आज कोळसा भरलेली मालगाडी रुळावरून घसरली. या घटनेत मालगाडीचे सहा डबे घसरून उलटले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ही मालगाडी सुरतच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण दिवस सुरत-भुसावळ मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
