शहाआलम नगरातील गल्ली क्र. ३ मध्ये घाणीचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, पालिकेच्या दुर्लक्षावर संताप..

0
New-Doc-05-13-2025-14.55.jpg


आबिद शेख/अमळनेर



अमळनेर शहरातील शहाआलम नगर परिसरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिक आरोग्याच्या गंभीर धोक्यांत सापडले आहेत. गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरले असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, याच गल्लीत एक अरबी शाळा असून लहान मुलांची ये-जा सतत सुरू असते. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. नगरपालिकेने तातडीने गटारींची सफाई करून परिसर निर्जंतुकीकरण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed