मुंदाने भजनी मंडळास जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक..

0
New-Doc-05-12-2025-21.02.jpg


आबिद शेख/अमळनेर

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर : श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत जय हनुमान भजनी मंडळ, गणपती मुंदाने, पारोळा या मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा दिनांक ३ ते ५ मे दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुंदाने भजनी मंडळाने “चला हो पंढरी जाऊ” हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि “घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे” हा संत सेना महाराजांचा अभंग सादर केला.

भजनी मंडळात एकनाथ पाटील, तुकाराम पाटील, खुशाल पाटील, गोपाल पाटील, सोपान पाटील, सागर महाराज आणि निखिल चौधरी यांचा समावेश होता.

संस्थेचे गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज, कोमल सिंग बुवा, जयदेव बुवा, सारंगधर बुवा आणि अरुण बुवा यांच्या हस्ते विजेत्या भजनी मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed