लग्न समारंभात डीजे आणि फटाक्यांचा गोंगाट; प्रशासनाचे दुर्लक्ष?
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या लग्न समारंभांमध्ये रात्री उशिरापर्यंत, तब्बल बारा वाजेपर्यंत डीजे आणि बँडचा गोंगाट सुरू असतो. या आवाजामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना या ध्वनीप्रदूषणाचा मोठा त्रास होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नॅशनल रेडिमेड
याशिवाय, रात्री फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. त्यामुळे जर कोणी जखमी झाले किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
बँड आणि डीजेचा आवाज अनेकदा अनुमतीपेक्षा अधिक डेसिबलमध्ये असतो, परंतु प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तीव्र तक्रार आहे.
सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे की, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.
