२८ एप्रिलपूर्वीच उमरा यात्रेवर गेलेल्यांना परत येणे बंधनकारक; -नियमभंग केल्यास २२ लाखांचा दंड व ब्लॅकलिस्टची कारवाई
24 प्राईम न्यूज 15 April 2025
सध्या उमरा यात्रेसाठी सऊदी अरेबियात गेलेले सर्व यात्रेकरूंना २८ एप्रिलच्या मध्यरात्रीपूर्वी आपल्या देशात परतणे आवश्यक आहे. ही अंतिम मुदत ओलांडल्यास उमरा सेवा देणाऱ्या कंपन्यांवर १ लाख सऊदी रियाल (सुमारे ₹२२ लाख) दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय, वेळेवर न परतणाऱ्या यात्रेकरूंना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्या सऊदी अरेबियातील प्रवेशावर बंदी घालण्यात येईल.
सध्या सऊदी अरेबियात १ लाखांहून अधिक उमरा यात्रेकरू आहेत, त्यापैकी सर्वाधिक ५०,००० यात्रेकरू उत्तर प्रदेशातील आहेत. सऊदीच्या गृह मंत्रालयाने (Ministry of Interior) सर्व उमरा कंपन्यांना याबाबत पत्र पाठवले असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरूनही सूचना जारी करण्यात आली आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की वीजा कालावधी संपल्यानंतरही जर कोणी यात्रेकरू सऊदीत थांबले, आणि त्यांच्या परतीची माहिती कंपन्यांकडून वेळेवर दिली गेली नाही, तर कंपन्यांवर कारवाई होईल. उमरा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सर्व यात्रेकरूंचे वेळेवर परत येणे सुनिश्चित करावे. कोणतीही दुर्लक्ष किंवा नियमभंग झाला तर सरकार कडक कारवाई करणार आहे, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.
