सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल — सुनिता मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार..

0
New-Doc-04-09-2025-23.12.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर येथील सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जळगाव येथील ‘सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन’च्या वतीने दिला जातो.

जळगाव येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रमेश मकासरे हे होते. यावेळी रिपाईचे माजी जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे, पश्चिम जिल्हाध्यक्ष आनंद खरात, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, तसेच सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा लक्ष्मी कुमावत सोनवणे उपस्थित होते.

सुनिता मोरे यांचे सांस्कृतिक, सामाजिक कार्य हे प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याने अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed