चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलासाठीआ….फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन…

0
IMG-20230211-WA0018.jpg

धुळे (अनिस अहेमद) NHAI तसेच सोनगीर व अवधान टोल नाका यांच्या दुर्लक्षपणामुळे पावसाळ्यात महामार्गाचे पाणी शहरात शिरून मोठ्या प्रमाणात शहरालगत असलेल्या नागरीकांचे मोठ्या प्रमाणात

नुकसान झाले होते. त्याच्यासाठी NHAI व अवधान व सोनगीर टोल नाक्यावाल्यांनी तत्काळ पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज करण्यात

यावे तसेच चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल नसल्यामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.तसेच दोन्ही ठिकाणी नागरिकांना कुठल्याही सुविधा न देता टोल आकारणी केले जाते याविरोधात आ.फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आमदार फारुख शाह यांनी भूपु मंत्रालय केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून उड्डाणपूल मंजुर करून घेतला आहे. परंतु आजपर्यंत त्याचे काम सुरु झालेले नाही. तसेच महाराष्ट्राच्या सीमेपासून ते नाशिकपर्यंत महामार्गाची व्यवस्था बराब झालेली आहे. त्यामुळे टोल नाक्यावाल्याना टोल घेण्याचा अधिकार नाही. या सगळ्या मागण्या घेवून आज आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळेस आमदार फारुख शाह यांनी एका पत्रकाद्वारे पुढील मागणी केली आहे ती अशी धुळे शहर लगत इरकॉन सोमा टोलवे अंतर्गत येणान्या क्षेत्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे पाणी महामार्गाने धुळे शहरात शिरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहराच्या नागरिकांची वित्त हानी होते. त्यामुळे ह्या पाण्याचा निचरा करण्यासाठी इरकॉन सोमा टोलवेमार्फत वेगळी ड्रेनेज पाईप लाईन करून पाण्याचा निचरा करण्यात यावा अशी मागणी मी यापूर्वी केलेली आहे. परंतु आजपर्यंत याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच सुल्तानिया मदरसा येथील मव्हीम रोडची व्यवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. तसेच सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तसेच धुळे शहरातील व वडजाई भागातील लोकांना त्याचा त्रास होतो. यापूर्वी सुद्धा दुतर्फा मटारीच्या कामासंदर्भात पत्र देवून सुद्धा काम झालेले नाही. तसेच जा. क्र.८७५ दि.३१/१२/२०२० रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना चाळीसगाव चौफुली होणारे ट्राफिक जाम आणि अपघातासंदर्भात पत्र देण्यात आले होते. त्यांनी त्यावेळेस दि.४ मार्च २०२१ रोजी मला पत्राद्वारे उत्तर दिने की नवकरच उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात येईल. परंतु आजपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु झालेले नाही. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. टोलनाक्याच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांचा पी. आर. वर्फ गेल्या ४ वर्षां पासुन केलेला नाही. त्यामुळे शहरातील सबवे अत्यंत खराब झालेले आहेत. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे ते मालेगावपर्यंत रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्याची एक साईट बंद ठेवण्यात येते त्यामुळे या सहा महिन्यात अनेक अपघात झालेले आहेत. तसेच रस्त्याची व सहमरोडाची साफसफाई होत नाही. रस्त्याच्या मध्यभागी आहे लावलेले नाहीत जे लावलेले आहेत त्याची निगा राखली जात नाही. टोल परिसरातील टॉयलेट, बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात पाण असते साफसफाई केली जात नाही. तसेच प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. आम्ही अनेकदा टोल नाक्यावरून गेलो असता तक्रार पुस्तिका मागितली असता ती आढळून आली नाही. टोल भरणाऱ्या वाहन धारक व नागरिकांसाठी शौचालय व वॉशरूम उपलब्ध नाही. माल वाहतुक करणाऱ्या
अवजड वाहनांच्या पालकांसाठी व वाहकांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, मोठया
प्रमाणात टोल वसुली करूनही टोल माफियांकडून सर्वांना हाताशी घेऊन शहरी हद्दीतील जवळ जवळ
सर्वच सर्व्हिस रोडची दुरावस्था झालेली असुन त्या संपुर्ण परिसरामध्ये पथदिवे लावण्यात आलेले नाही. शहरी भागात पथदिवे नसल्याकारणाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोर, दरोडेखोर यांच्या सारख्या घातक विकृतींनी दोन लोकांचा खुन करून त्यांच्या कडील ऐवज, रक्कम, सोने-नाणे लुटुन नेण्याच्या घटना घडल्या आहेत. याच्या तक्रारी करून देखील याबाबत संबंधितांनी गंभीर दखल घेतली नाही. ज्या ठिकाणी पावसाळ्याच्या व सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी करणे आवश्यक होते मात्र त्याठिकाणी गटारी करण्यात आलेल्या नाही. यामुळे तेथील रहिवासीयांच्या घरात व व्यावसायिकांच्या दुकानात पाणी घुसते व नुकसान होते याची देखील तक्रार आमदार कार्यालयाकडून व नागरिकांकडून करण्यात आलेली होती त्यावरही अदयाप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत भुपृष्ट मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे व ईमेलद्वारे आमच्या कार्यालयामार्फत मागणी करण्यात आलेली आहे. परंतु याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आज दि. ११ फेब्रुवारी रोजी आम्ही या समस्या सोडविण्यासाठी व केंद्रीय भूपु मंत्रालय तसेच NHAI यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केले आहे तरी याची तत्काळ दखल घेण्यात यावी या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व शहराचे नागरिक उपस्थित होते.आंदोलनात सलीम शाह,भिखन हाजी शाहजिल्हाध्यक्ष नासिर पठाण, शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.दिपश्री नाईक,नगरसेवक सईद बेग,नगरसेवक गनी डॉलर,नगरसेवक आमिर पठाण,माजी नगरसेवक साबीर सैय्यद,माजी नगरसेवक साजिद साई,रफिक पठाण,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,शोएब मुल्ला,निजाम सैय्यद,आसिफ शाह मुल्ला,नुरा ठेकेदार,आसिफ शाह,परवेज शाह, निसार अन्सारी, हालीम शमसुद्दीन,वसिम अक्रम, कैसर अहमद,फातेमा अन्सारी, शाहेदा अन्सारी, महेमुदा अन्सारी, अकीला सैय्यद,रिझवान मणियार, जुबेदा शेख, हमिदा पठाण, सलीम शाह,सत्तार शाह,फकृद्दिन लोहारशहेबाज शाह,शेख,माजिद पठाण,सउद आलम ,सउद सरदार,अझर सय्यद, अकीब अली,जुबेर शाह,नझर पठाण, ईबा ठेकेदार,समीर मिर्झा,जीलानी खाटीक,निजाम तिरंगा,वसिम पिंजारी,रिझवान अन्सारी, साकिब शाह,बादल शाह,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed