ब्रिटनच्या Ofsted विभागाच्या हंगामी प्रमुखपदी सर हामिद पटेल यांची नियुक्ती..
24 प्राईम न्यूज 17 मार्च 2025
ब्रिटन सरकारने शिक्षणाच्या दर्जावर देखरेख ठेवणाऱ्या Ofsted (ऑफिस फॉर स्टँडर्ड्स इन एज्युकेशन) विभागाच्या हंगामी प्रमुखपदी भारतीय वंशाचे सर हामिद पटेल यांची नियुक्ती केली आहे. गुजरातच्या भरूच येथील सर हामिद पटेल यांनी ब्रिटनमध्ये शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ३६ शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत, जिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ब्रिटन सरकारने त्यांना यापूर्वीच ‘सर’ हा किताब बहाल केला होता.
भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची अशी प्रतिष्ठित पदावर नियुक्ती होणे अभिमानाची बाब असून, संपूर्ण भारतीय समाजाने त्यांचा सन्मान करावा. सर हामिद पटेल यांना हृदयपूर्वक शुभेच्छा!
