पाडळसरे धरणासाठी १०० कोटींची तरतूद, पण PMKSYमध्ये समावेश नाही.. -सुभाष चौधरी..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे समाधान व्यक्त केले जात असले तरी धरणाचा समावेश अद्यापही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून अजूनही मोठ्या निधीच्या मंजुरीची अपेक्षा आहे, असे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी यांनी सांगितले.
सध्या प्राप्त झालेला आणि यापूर्वी मंजूर झालेला निधी जून महिन्यापर्यंत पूर्णपणे खर्च करण्याची आवश्यकता आहे. तसेच, धरणाच्या कामासाठी मंजूर झालेल्या निधीचा गैरवापर होऊ नये, अशी मागणी जनआंदोलन समितीने केली आहे. या कामावर समितीने सतत लक्ष ठेवण्याचा निर्धार केला आहे.
