राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड प्रकरणी ४ आरोपी अटकेत, ३ फरार..

0
New-Doc-03-04-2025-09.43.jpg

आबिद शेख/अमळनेर

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड आणि पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अनिकेत भोईसह चार जणांना सोमवारी अटक करण्यात आली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

मुख्य आरोपी अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक असून, रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे. त्याच्यासह किरण माळी, अनुज पाटील आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण माळी हा देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांपैकी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed