अमळनेर बाजार समितीच्या वार्षिक सभेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग..

0
New-Doc-02-20-2025-07.22.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा प्रथमच विविध विषयांवर सलग दोन तास चर्चा करून संपन्न झाली. बाजार समितीच्या उत्तम कामकाजाचे कौतुक करत संचालक मंडळाचे अभिनंदन करणारा ठराव उपस्थित शेतकऱ्यांनी मंजूर केला. यावेळी हजारो शेतकरी सभासदांना बाजार समितीच्या वतीने ट्रॅव्हल बॅग भेट देण्यात आली.

ही सभा प्रथमच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश पिरण पाटील होते. या वेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संबंधित विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करत सखोल चर्चा केली. जयवंतराव पाटील, गावरान जागल्या सेनेचे प्रा. गणेश पवार, अनिल बोरसे, शिवाजीराव पाटील, गणेश भामरे, संजय पाटील, विकास धोंडू पाटील, रमेश पाटील, दिलीप पाटील आदींनी कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, मारवड उपबाजार विकसित करणे आणि गुरांचा बाजार सुरू करण्यासंबंधी विषय मांडले.

बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम असून लवकरच शेतकरी भवन आणि विविध विकासकामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही सभापती अशोक आधार पाटील यांनी दिली. तसेच, डॉ. अनिल शिंदे आणि भोजमल पाटील यांनीही उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संचालकांनी केले. प्रस्तावना हिरालाल पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन संचालक प्रा. सुभाष पाटील यांनी व्यक्त केले. बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड व योगेश महाजन यांनी हिशोबाचे वाचन केले. या सभेस डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, डॉ. अशोक पाटील, भोजमल पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, सौ. सुषमा देसले, सौ. पुष्पा पाटील, नितीन पाटील, भाईदास भिल, प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख, शरद पाटील यांसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed