अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज

0
IMG-20250207-WA0035.jpg

आबिद शेख/अमळनेर. -अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज, 7 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता अमळनेर येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ होणार आहे.

या कार्यक्रमासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख तसेच विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर येथील कार्यालयात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed