इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहपूर्वक साजरा

0
New-Doc-01-25-2025-22.36.jpg

आबिद शेख/अमळनेर

नंदुरबार येथील अबुलगाजी नगरमध्ये इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या वतीने 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये नवमतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ज्या नागरिकांनी त्यांच्या मतदार ओळखपत्रांच्या दुरुस्तीची विनंती केली होती, त्यांना सुधारित ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. एजाज भाई बागवान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे.

BLO-356 बासीत मुस्लिम खान यांची विशेष प्रशंसा करण्यात आली, कारण त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे मतदान कार्ड वाटप केले आणि ज्यांचे पत्ते बदलले होते त्यांची माहिती शोधून त्यांनाही ओळखपत्रे वितरित केली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात हाजी कमरोद्दिन खाटीक, अब्दुररहमान पठाण, खाटीक रियाज, खाटीक मुस्तकीम, ज़क्वान काझी, तय्यब शेख, आणि नमीर खान यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले आणि उपस्थितांना लोकशाहीचे महत्त्व समजावून देण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed