अमळनेर नगरपरिषदेची प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई..

0
New-Doc-01-09-2025-22.51.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे काल प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली. यात १२० मायक्रोन पेक्षा कमी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग यांचा वापर केल्याकारणाने चार दुकानदारांना एकूण ११,००० रुपये दंड ठोठावला. तर येथून पथकाने एकूण २.५० किलो प्लास्टिक जप्त केले ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
अमळनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून बुधवारी दुपारी शहरातील हजुरी रेस्टॉरंट व साई रेस्टॉरंट अमळनेर या दोघांकडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, पन्नी आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. यात हजुरी रेस्टॉरंट व साई रेस्टॉरंट यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक साठवणूक व विक्री केल्याबद्दल ५०००/- तर शकील बागवान आणि शोएब बागवान यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग मधून विक्री केल्याबद्दल ५००/- रुपये दंड आकारण्यात आला.
नगरपरिषद मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गडरी, पथक कर्मचारी अनंत अशोक संदानशिव , शामराव आधार करंदीकर , योगेश आधार पवार, महेंद्र नाना बिऱ्हाडे , युनूस शेख, कामरोद्दिन शेख, सतीश दौलत बिऱ्हाडे यांनीही कार्यवाही केली. दरम्यान मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग यांचा वापर न करण्याचे व कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed