अमळनेर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट, वाहनचालक त्रस्त !प्रशासन सुस्त.

0
New-Doc-12-11-2024-10.35.jpg

आबिद शेख/अमळनेर. -शहरातील अनेक पशुपालक आपल्या जनावरांना सकाळी दहा वाजेपासून मोकाट सोडून देत आहेत. त्यामुळे ही जनावरे शहरातील विविध भागात फिरून रहदारीस अडथळा निर्माण करत आहेत. मोकाट जनावरे रहदारीच्या रस्त्यात ठिय्या मांडून बसत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर जनावरे सर्रासपणे वावरतांना दिसतायंत. त्यामुळे वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोयं. शहरातून प्रमुख रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नेहमीच या मोकाट जनावरांचा वावर असतो. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून गाडी चालवायला अडचणींचा सामना करावा लागतो. कारण ही मोकाट जनावरे अचानकच वाहनधारकांकडे आपला मोर्चा वळवतात.शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण होत आहे. शिवाय भर रस्त्यात अनेकदा या जनावरांची आपसातल्या भांडणांमुळे अनेक वाहनांचे नुकसान देखील होते. या मोकाट जनावरांना नियंत्रित करण्याचं काम असणाऱ्या अमळनेर नगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष करणेच सोईची समजले आहे. अनेकदा ही मोकाट जनावरे शाळकरी विद्यार्थ्यांच्या मागे देखील लागतात. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed