अमळनेर मतदार संघात डॉ. अनिल शिंदेंना उमेदवारी. अमळनेरात आता तिरंगी लढत

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर डॉ. अनिलशिंदे हे उमेदवार निवडणूक लढवणार आहे. तरी अमळनेर मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. महायुतीत असलेले विद्यमान मंत्री अनिल पाटील हे यावेळी अजित पवार गटाचे तिकीट घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर माजी आमदार शिरीष चौधरी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर डॉ. अनिल शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. या बाबत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
