साथी गुलाबराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिना निमित्त आज साने गुरुजी विद्यालयात नूतन इमारतीचे भूमिपूजन व जलकुंभाचे उदघाटन. – 23 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

0
New-Doc-08-22-2024-08.41-1.jpg

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर चे माजी आमदार व खानदेश ची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे “साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार” धुळे येथील राजेंद्र छत्रालयाचे प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ यांना जाहीर झाला आहे, सदर पुरस्कार पदमंश्री कांतिभाई शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे तर साथी गुलाबराव पाटील राजकिय पुरोगामी पुरस्कार नागपूर जिल्ह्यातील खुरसापूर येथील प्रा सुधीर गोतमारे याना जाहीर झाला आहे सदर पुरस्कार शिक्षक भारती चे कपिल पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे ,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिले जाणारे हे राज्यस्तरीय पुरस्कार असून, 24 ऑगस्ट रोजी ते प्रदान केले जाणार आहेत, तर साथी गुलाबराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिना निमित्त 22 ऑगस्ट रोजी साने गुरुजी विद्यालयात नूतन इमारतीचे भूमिपूजन व जलकुंभाचे उदघाटन केले जाणार आहे तर 23 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ,वैचारिक मेजवानी चे आयोजन, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे करण्यात आल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed