जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला संभाजीराजे छत्रपतींवरील टीकेचे पडसाद.
24 प्राईम न्यूज 2 Aug 2024. संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर स्वराज्य संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी हल्ला केला. मुंबईतून ठाण्यातील निवासस्थानी जात असताना ३ कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मुंबई- नाशिक महामार्गावर उतरत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना बाजूला केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला असून आव्हाडांनी संभाजीराजेंची माफी मागावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
