आराध्या पाटील स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून प्रथम–

0
New-Doc-07-06-2024-06.20.jpg

अमळनेर/प्रतिनिधी. कळमसरे ता. अमळनेर —– तालुक्यातील सेन्ट मेरी इंग्लीश मेडिअम स्कुलची विद्यार्थींनी कु. आराध्या मुकेश पाटील हिने इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथामिक स्कॉलरशिप परीक्षेत अमळनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून तिचे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे. आराध्या ही साने गुरूजी हायस्कुलचे उपशिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर व उपशिक्षिका स्नेहल मुकेश पाटील यांची मुलगी आहे. तर अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.अमृत बाजीराव पाटील यांची नात आहे. तिच्या यशाबद्दल आई -वडील , आजी आजोबा , सेन्ट मेरी शाळेच्या प्रिन्सिपल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक , मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर वृंद तसेच दुनियादारी गृप जी . एम . सोनार नगर , मुंदडा नगर अमळनेर यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed