सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध.अर्ज भरताना महायुतीचे नेते गैरहजर.

24 प्राईम न्यूज 14 Jun 2024. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सुनेत्रा पवारांची – बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीचा एकही नेता उपस्थित नव्हता.
बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झालेल्या सुनेत्रा पवारांनी आता संसदेत मागच्या दरवाजाने एंट्री घेतली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेलानाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार हे जवळपास आधीच निश्चित झाले होते. गुरुवारी विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला. यावेळी अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. राज्यसभेच्या
