ठाकरे मोदींसोबत जाणार नाहीत-शरद पवार

0
New-Doc-09-27-2023-08.18.jpg

24 प्राईम न्यूज 22 May 2024

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत जाणार नाहीत, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.

सत्तास्थानी कोण बसणार यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीचा विषयही सध्या चर्चेत आहे. यावर शरद पवार पुढे म्हणाले की, भाजपने ७५ वर्षांच्या वयोमयदिची अट घालून देत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपच्या सक्रिय राजकारणातून बाजूला केले. हेच सूत्र नरेंद्र मोदींनाही लागू पडते. पक्ष आणि ते स्वतः या अटीबाबत प्रामाणिक असतील, तर केजरीवाल म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या वर्षी मोदींना निवृत्त व्हावेच लागेल. त्याआधी नेतृत्वासाठी पुढचा पर्याय कोण यावर भाजपला नक्कीच विचार करावा लागेल. अमित शहा देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींच्या हातून घेतील की नाही यासंदर्भात माझ्याकडे माहिती नाही. मी जेवढे पंतप्रधान मोदींना ओळखतो, त्यानुसार भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास आणि त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ आली, तर ते स्वतःच पंतप्रधानपदापासून दूर होतील, असेही शरद पवार म्हणाले. सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. आता देशपातळीवर इतर राज्यांमध्ये दोन टण्यांचे मतदान शिल्लक आहे.

१जन रोजी प्रस्थित पोल आणि ४ जून रोजी लोकसभेचा अंतिम निकाल हाती येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed