निकाला दिवशीच जरांगेंचे पुन्हा उपोषण.

0
New-Doc-10-23-2023-07.40.jpg

24 प्राईम न्यूज 21 May 2024. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार असून त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. ४ जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरू होईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार असून त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. ४ जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरू होईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली तर उपोषण स्थळी राज्यातील गरजवंत समाज एकत्रित जमणार आहे. गरीब समाजासाठी माझा लढा सुरू असून या लढ्यात सर्वच समाज एकत्रित येणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. माझ्या आंदोलनामागे कोणीही नाही. फूस लावण्याचा तर प्रकार लांबच राहिला, काहीही कारणं जोडू नका. इथे मराठा एक झालेला आहे. आंदोलने ही सरकारच्या फायद्यासाठी होत असतात. मात्र माझे आंदोलन समाजासाठी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed