अमळनेर टू व्हीलर मेकॅनिक संघ यांच्या वतीने ९ रोजी मतदान जनजागृती बाईक रॅली..

0
New-Doc-05-08-2024-06.39.jpg


अमळनेर/प्रतिनिधि
उद्या ९ रोजी येथील अमळनेर टू व्हीलर मेकॅनिक संघ यांच्या वतीने मतदान जनजागृती बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती करण्यासाठी मेकॅनिकल संघ अमळनेर यांनी बाईक रॅली काढण्याचे आयोजन केलेले आहे ९ रोजी सकाळी नऊ वाजता ही रॅली काढणार असून काढण्यात येणार आहे. त्यात संत सखाराम महाराज संस्थान वाडी चौक पासून सुरुवात होऊन रूपजी नगर, पैलाड, सुभाष चौक, तांबेपुरा, बंगाली फाईल, ढेकू रोड, पिंपळे रोड, पोलीस ठाण्या जवळील भिल्ल वस्ती, बाजार समिती मागील भागातून झामी चौक, अशी जाऊन समारोप तहसील कार्यालय येथे करण्यात येणार आहे.
आयोजनासाठी अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष कादिर खान वजीर खान, पठाण, उपाध्यक्ष रोहिदास नारायण पाटील आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed