आयपीएस अधिकारी रहमान यांची निवडणूक लढण्याची शक्यता धूसर?

0
New-Doc-05-02-2024-08.28.jpg

24 प्राईम न्यूज 2 May 2024. धुळे येथून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत तहकूब केली. मात्र, पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीखही शुक्रवारी संपत असल्याने रहमान यांची लोकसभा निवडणूक लढविण्याचे शक्यता धूसर झाली आहे.

स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात कोणतीही अडचण नाही. तरीही केंद्र सरकारकडून स्वेच्छानिवृत्तीची मागणी मान्य केली जात नाही, असा दावा करणाऱ्या रहमान यांच्या याचिकेवर गेले काही दिवस सुनावणी सुरू आहे. सध्या रहमान यांच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू असून अद्याप केंद्र सरकारचा युक्तिवाद व्हायचा आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय देईल.

आयपीएस अधिकारी रहमान यांची निवडणूक लढण्याची शक्यता धूसर?

मुंबई : धुळे येथून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत तहकूब केली. मात्र, पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीखही शुक्रवारी संपत असल्याने रहमान यांची लोकसभा निवडणूक लढविण्याचे शक्यता धूसर झाली आहे.

स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात कोणतीही अडचण नाही. तरीही केंद्र सरकारकडून स्वेच्छानिवृत्तीची मागणी मान्य केली जात नाही, असा दावा करणाऱ्या रहमान यांच्या याचिकेवर गेले काही दिवस सुनावणी सुरू आहे. सध्या रहमान यांच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू असून अद्याप केंद्र सरकारचा युक्तिवाद व्हायचा आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed