पुण्यात एनआयएची मोठी कारवाई दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत सील..

0
New-Doc-03-18-2024-07.32.jpg

24 प्राईम न्यूज 18 Mar 2024. पुणे – राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून आयसीसच्या दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांच्या चौकशीतून त्यांनी कोंढव्यातील मिठा नगर परिसरातील इमारतीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली. यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही इमारत सील केली. मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्त्वाच्या शहरात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेले हे दहशतवादी या इमारतीत प्रशिक्षण घेत होते. यानंतर त्यांनी कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात नियंत्रित पद्धतीने बॉम्बस्फोट केले होते.NIA सोबतच शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले आहे

एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम आणि त्याच्या साथीदारांना कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. तपासासाठी कोंढव्यात नेताना मोहम्मद पसार झाला होता. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडून एनआयएच्या ताब्यात दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed