रामेश्वर कॉलनी भागात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ…. -माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न..

0
New-Doc-02-20-2024-11.55.jpg

अमळनेर/ प्रतिनिधी

अमळनेर शहरातील रामेश्वर कॉलनी भागात नगरोत्थान योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर नगरपरिषदेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेच्या अंतर्गत रामेश्वर कॉलनी परिसरात काँक्रिटीकरण कामासाठी १६ लाख ७१ हजाराचा निधी मंजूर झाला असून दिनांक १८ रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रताप शिंपी, प्रा. सुरेश पाटील, विजय पाटील, राकेश शेटे, सोनू पाटील, बाळू संतोष पाटील, कुंदन शेटे, गोकुळ पाटील, शरद पाटकरी, मोहन बडगुजर, बिरारी टेलर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रामेश्वर कॉलनी परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी केली होती. सदर कामास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी मंत्री अनिल पाटील तसेच माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed