सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी अमळनेर पोलिसांचा रुटमार्च…
अंमळनेर /प्रतिनिधी आगामी काळात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी अमळनेर पोलीस दलामार्फत शहरात 17 रोजी रात्री रुटमार्च काढण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी शहरातील झामी चौक, भोई वाडा, माळी वाडा, कसाली डीपी, वाडी संस्थान, सराफ बाजार, दगडी दरवाजा, गांधलीपुरा अशा संमिश्र व संवेदनशील परिसरात 17 रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पोलीस रुटमार्च काढण्यात आला. सदर रुट मार्च मध्ये 5 पोलीस अधिकारी, 35 अंमलदार व 25 होमगार्ड उपस्थित होते.
