महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध विषयांवर प्रशिक्षण..
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना पारोळा यांच्या वतीने पारोळा तालुक्यातील ग्रामीण विभाग अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींना दि ९ रोजी विजयानंद हॉल येथे विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रम मा.बाल विकास प्रकल्प अधिकारी पारोळा एस. आर धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी डॉ.वैशाली नेरकर होत्या.
कार्यक्रमात लेक लाडकी व बेटी बचाव बेटी पढाव या योजनेविषयी पर्यवेक्षिका छाया गोविंद सपकाळे यांनी मार्गदर्शन केले.ॲड सिद्धांत मिसर यांनी महिलांचे हक्क,संरक्षण व कायदे बालविवाह या बाबत विस्तृत माहिती दिली.म्हसवे येथील सरपंच ज्योती संदानशिव यांनी व्यक्तिमत्व विकास, किशोरावस्थेची जाणीव व जागृती,गुडटच बॅडटच याबाबत दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन माहिती दिली.विमा सल्लागार पद्माकर साळुंखे यांनी विमा पोलिसी बाबत मार्गदर्शन केले.संरक्षण अधिकारी कनिष्ट राजू बागुल यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५,व बाल संगोपन योजना तसेच महिला लोकशाही दिन याबाबत माहिती दिली.पोस्टल असिस्टंट विजय पाटील यांनी पोस्टातील योजना बाबत माहिती दिली.
अध्यक्षस्थानावरून डॉ.वैशाली नेरकर यांनी किशोरी मुलींना मासिक पाळी,स्त्री भृणहत्या या संदर्भात समुपदेशन केले तसेच मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार मल्टी विटामिन गोळ्या वाटप केल्या.
या वेळी पर्यवेक्षिका मीना पाटील, वैशाली पाटील,वर्षा बोरसे उपस्थित होत्या.संरक्षण विभागातील कुलदर्शनी पाटील, शशिकांत पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.सूत्रसंचालन कनिष्ट सहाय्यक शितल सोनवणे यांनी केले.प्रास्ताविक पर्यवेक्षिका मोहिनी कुलकर्णी यांनी केले.
