अखेर क्रीडा संकुलाचा कायापालट होणार…. -जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून कामाची पाहणी
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले होते,मात्र आता आमदार चिमणराव पाटलांच्या प्रयत्नातून या संकुलाच्या रखडलेल्या कामास सुरूवात होऊन लवकरच त्याची कायापालट होणार आहे. खुल्या तालिमेसाठी युवकांसह क्रीडा प्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी क्रीडा संकुलाचा गेल्या ३ महिन्यांपुर्वी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रस्तावाचा आमदार पाटील यांनी आवश्यक तो पाठपुरावा करून पारोळा व एरंडोल तालुका क्रिडा संकुलासाठी प्रत्येकी ५ कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आली होती.या मंजुरी नंतर कामाला तातडीने प्रशासकीय बाबी पुर्ण करून काम सुरू करण्याचा सुचना ही आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.या क्रिडा संकुलाचा कामाचा सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करून अखेर आज या संकुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आल्याने त्याची कायापालट होणार आहे.या कामाची पाहणी आज जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी करून मैदानी खेळांसह इतर बंदिस्त खेळ सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना प्रथम प्राधान्याने पुर्ण करा तसेच दैनंदिन वाॕकिंग,योगा यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सुचना दिल्या.दरम्यान,या संकुलाचा कामाला गतीने पुर्ण करून लवकरच ते क्रिडा प्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.
