डॉ. अरविंद बडगुजर यांची विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर निवड..
एरंडोल(प्रतिनिधी)येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भूगोल अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवडून आले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अमित दादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय एन. ए.पाटील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर बंधू यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
