शिवशाही फाऊंडेशनतर्फे कोळपिंप्रीत सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण !

0
New-Doc-09-19-2023-22.34.jpg

अमळनेर ( प्रतिनिधि)

पारोळा गाव चावडी म्हटले म्हणजे गप्पागोष्टी ची मैफल रंगते. पूर्वीच्या काळी अशा मैफिली फार रंगायच्या त्यामुळे नात्यांमध्ये जिव्हाळा राहायचा. याच पार्श्वभूमीवर या मैफिलींना पुनर्जीवन देण्यासाठी तसेच तरुणाईला मोबाईल पासून अलिप्त ठेवण्यासाठी कोळपिंप्री (ता पारोळा) येथील गावांतील चौका- चौकात बसण्यासाठी शिवशाही फाऊंडेशनतर्फे “सिमेंटचे बाक” भेट स्वरूपात देण्यात आले. ग्राम विकास शिक्षण संस्थेचे माजी संचालक तथा आदर्श शिक्षक स्वर्गीय बापूसो प्रतापराव राजाराम काटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे सिमेंटचे बाक बसविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
माजी सरपंच भिकन काटे, वि का सोसायटीचे माजी चेअरमन गिरीश काटे, प्रसिद्ध कीर्तनकार धनराज महाराज काटे, जेष्ठ नागरिक रमेश मोरे, सरपंच महेश काटे, वि.का. सोसायटीचे संचालक सुभाष काटे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काटे यांच्या हस्ते स्वर्गीय प्रतापराव काटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गावातील उदय काटे, गंजीधर काटे, प्रशांत काटे, प्रवीण साळुंखे, राजेंद्र साळुंखे, मनोहर काटे, देवानंद काटे, शांतीलाल काटे, दौलत पाटील, सुदेन्दू काटे, संजय काटे, राजेंद्र निकम, पोलीस पाटील नंदलाल काटे, सुभाष काटे, दीपक काटे, सागर काटे, प्रल्हाद गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, मयूर काटे, वैभव काटे, दादा काटे, पिंटू काटे आदींसह वि.का. सोसायटीचे चेअरमन तथा शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे सचिव उमेश काटे, शाहूराजे काटे, दक्षता काटे आदी सह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed