एसटी कर्मचारी संघटनेचा राज्यभर संप करण्याचा इशारा.

0
New-Doc-09-09-2023-08.59.jpg

24 प्राईम न्यूज 10 Sep 2023 महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करूनही आणखी चार टक्के वाढ मिळावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसले आहे. सोमवार, दि. ११ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर १३ सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला
आहे राज्य सरकारने नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनाही तितकाच महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र कामगार संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed