“आंदोलन मागे घेत नाही, केवळ राज्य सरकारला चार दिवसांची मुदत दिली आहे.”. -मनोज जरांगे – पाटील उपोषणावर ठाम.

0
New-Doc-09-06-2023-07.49.jpg

24 प्राईम न्यूज 6 Sep 2023 “आंदोलन मागे घेत नाही, केवळ राज्य सरकारला चार दिवसांची मुदत दिली आहे.” असे ठाम मत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी या गावात जाऊन भेट घेतली. यावेळीमुदत दिली आहे. पाटील म्हणाले, आरक्षणप्रश्नी नेमलेल्या समितीच्या सरकारला प्रतीक्षा होती. हा अहवाल आजच आला आहे. परंतु, त्यानुसार पुढची कार्यवाही करायला त्यांना चार दिवस लागतील.

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आपण त्यांना वेळ देत आहोत म्हणजे आपण आंदोलन मागे घेत नाही. माझं म्हणणं नीट ऐकून घ्या. आपल्या समाजाच्या वतीने आपण गिरीश महाजन आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला फक्त चार दिवस देत आहोत. आपण त्यांना मोकळ्या मनाने चार दिवसांचा वेळ दिला आहे. पुढच्या चार दिवसांमध्ये ते आरक्षणाचा जीआर (अधिसूचना) घेऊन येतील. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आपण सध्या सुरू आहे तसंच शांततेत आंदोलन करायचं आहे. सरकारच्या वतीने त्यांनी जीआर (अधिसूचना) आणला की, त्यांचं स्वागत करायचं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed