मी मूळ राष्ट्रवादीसोबतच ! -नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण.

0
New-Doc-08-18-2023-08.29.jpg

24 प्राईम न्यूज 18 Aug 2023

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे नेमकी काय भूमिका घेणार याबाबत औत्सुक्य होते. नवाब मलिक यांनी मी कोणत्याही गटात जाणार नसून मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या विधानावरून तरी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार नाहीत असे स्पष्ट होत आहे. मात्र अजितदादा गटानेही आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मलिक यांना काय के अभिप्रेत आहे, हे अधिक स्पष्ट व्हावे ने लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. तब्बल दीड वर्षे ते तुरुंगात होते. नुकतीच त्यांची प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांच्या जामिनावर सुटका झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed