“त्या” तांबापुर वासियांसाठी मनीयार बिरादरी सरसावली
२५ कुटुंबीयांना प्रत्येकी दोन हजार रुपये सानुग्रह मदत..

0
New-Doc-07-09-2023-20.35.jpg

जळगाव ( प्रतिनिधि )

तांबापूर येथील मानवनिर्मित चुकीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत १२५ घरात पाणी घुसून जे झोपडपट्टी वासियांचे नुकसान झाले त्यासाठी मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी तांबापुर वासियांसोबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी, महापौर,आयुक्त तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे नुकसान भरपाई ची मागणी केलेली आहे व त्या आधारे महसूल विभागाने पंचनामे सुद्धा केलेले आहे.

https://youtu.be/zqCqKrYK5h8

शासनाची मदत येईल त्यापूर्वी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने स्वतः दखल घेऊन प्राथमिक स्वरूपात प्रथम पंचवीस कुटुंबियांना प्रत्येकी २ हजार रुपये सानुग्रह मदत दिलेली आहे.
जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात या झोपडीधारकांना मदत करण्यात आली यावेळी मनीयार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष सय्यद चांद, अब्दुल रऊफ रहीम, अख्तर शेख, वसीम शेख, मुजफ्फर शेख, मुजाहिद खान तसेच तांबापुर येथील समाजसेवक मतीन पटेल, आबीद शेख, वसीम बापू, इसा शेख, अमजद खान आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed