ॲड.किशोर काळकर यांची जनजाती विभाग प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती..
.
एरंडोल ( प्रतिनिधी ) एरंडोल येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड.किशोर काळकर यांची नुकतीच भाजपाच्या जनजाती विभाग प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती झाल्याचे पत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांनी दिले आहे.
दरम्यान पत्रात जनजाती आरक्षण असलेल्या ४ लोकसभा व ४८ विधानसभा क्षेत्रात ॲड.किशोर काळकर यांना संघटन कौशल्याने समन्वय साधण्याचे कार्य करावयाचे असुन त्यांचा संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता सदर जबाबदारी त्यांना देण्यात आली असल्याचा देखील उल्लेख केला आहे. ॲड.किशोर काळकर यांचे सोशल मीडिया तथा सर्वच स्तरांमधून या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.
